पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

। नागपूर । वृत्तसंस्था ।
नागपुरात एमपीएसची पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन देखील केले. पण, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चा कुठलाही पेपर फुटला नाही. याबाबतच्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिले आहे. नागपूरमध्ये पेपर फुटल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. पेपर फुटल्याचे सांगताना एका विद्यार्थ्याने स्वत:चा पेपरसुद्धा दाखवला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सील केलेले पेपर फुटल्याचे दिसले असाही दावा केला. पेपर फोडला तेव्हा केंद्राचे प्रमुखसुद्धा नव्हते. जेव्हा मला पेपर पारदर्शक कागदात दिसला तेव्हा शंका आली. आम्हाला मोबाईल नेता येत नाही. बॅगमधून मोबाईल घेऊन अभाविपच्या संपर्क साधून त्यांनी याबाबत विचारणा केली. इथल्या केंद्र प्रमुखांनी आम्हाला काहीच उत्तर दिले नाही, असेही विद्यार्थ्याने यावेळी सांगितले. आयोगाने असा प्रकार घडला असल्यास यात लक्ष घालावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Exit mobile version