निलेश देवकर यांचे निधन

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावातील निलेश जानू देवकर यांचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले. निलेश देवकर यांच्या एकाकी झालेल्या दु:खद निधनाने समस्त देवकर परिवारासह बाहे गावावर शोककळा पसरली आहे. तसेच, परिसरातूनही हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, तीन भाऊ, एक बहिण, पुतणे, भाचे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी 26 नोव्हेंबर रोजी तर अंतिम धार्मिकविधी 29 नोव्हेंबर रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version