संभाजी ब्रिगेड दक्षिण उपाध्यक्षपदी निलेश महाडीक

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र, समाजसेवक निलेश महाडीक यांची शनिवारी (दि.25) मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कोकण विभाग अध्यक्ष सचिन सावंतदेसाई तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे, राजु सुतार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व मकार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आपली शाखा व संघटना तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवणार असुन अन्यायाविरुद्ध पुढे येईल. तसेच संभाजी ब्रिगेडचे हाती घेतलेल्या सर्व कामांना तसेच महापुरुषांच्या विचारांचा प्रसार पोहचविण्याचे कार्य करेल. अशा विविध प्रकारच्या समस्यांवर ही संघटना काम करेल, त्याचबरोबर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेऊन हे कार्य पुर्ण करण्याची निलेश महाडीक यांनी शपथ घेऊन सर्वाना मार्गदर्शन केले.

Exit mobile version