| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दंतेवाडा-विजापूर सीमेवरील जंगलात झालेल्या चकमकीत नऊ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आले आहे. दंतेवाडा विजापूर सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी नक्षलींनी पोलीस दलाचा पीएलजीए कंपनी क्रमांक 02 वर गोळीबार केला. आतापर्यंत नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांनी यश आले आहे, अशी माहिती बस्तरचे महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली.