डंपरची कारला धडक; नऊ वर्षीय मुलगी जखमी

। पनवेल । प्रतिनिधी ।

घाटकोपर येथे राहणारे मिथिल राणे हे मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच 03 इ बी 83 53 घेऊन देवगड सिंधुदुर्ग येथे निघाले होते. यावेळी वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मिथिल यांची मुलगी त्रिशिका मिथिल राणे (9) जखमी होऊन बेशुद्ध झाली. तसेच कारचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताप्रकरणी डंपर क्रमांक एमएच 47 बी वाय 1220 वरील चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version