| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि दुरावस्थेसाठी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. नितेश राणे यांच्याकडून जुलै 2019 मध्ये उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 504 कलमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास व 1 लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे.
नितेश राणेंना एक महिन्याचा कारावास
