। उरण । वार्ताहर ।
उरणवरून नवी मुंबईकडे जाणार्या एन.एम.एम.टी बसला करळच्या चांदनी चौकाजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. दोन दिवस अगोदर उड्डाणपुलावर कार आणि एन.एम.एम.टीचा अपघात झाला होता.
एन.एम.एम.टी बस चांदनी चौकातून करळकडे वळवत असताना या गाडीचे स्टेअरींग लॉक झाले आणि ही गाडी सरळ सिमेंटचा कठडा तोडून दुसर्या मार्गावरून जाणार्या कंटेनर ट्रेलरला धडकली. सुदैवाने या गाडीची टक्कर ट्रेलरला झाली जर ट्रेलरची टक्कर बसला लागली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. या बसमध्ये जवळजवळ 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते.
एन.एम.एम.टी बसला अपघात
