। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेच्या चतुर्थ वार्षिक मूल्यांकनाच्या मालमत्ता करांमध्ये व दरामध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित नाही असे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी स्पष्ट केले.त्यामुळे शहवासियांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 119 (1) (2) अन्वये कर्जत मधील मालमत्ता धारकांना नोटीस पाठविल्या आहेत, या या नोटिशीमुळे कर्जतकरांच्या मनात टॅक्स वाढणार की काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे याबाबतची चर्चा कर्जत शहरात तसेच सोशल मीडियावर होताना दिसत आहे नपातर्फे पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये आपल्या घराचे कर आकारणी मध्ये तसेच केलेल्या फेरफार बाबत किंवा नावात काही चूक असल्यास किंवा मालमत्ता संबंधित आपली कोणती हरकत असल्यास सदर कारणे नमूद करून ती लेखी स्वरूपात मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे 25 डिसेंबर 2022 पर्यंत किंवा तत्पूर्वी पाठवावी व त्याची पोच पावती घ्यावी वरील मुदतीत आपल्याकडून लेखी हरकत अर्ज न आल्यास आलेली प्रस्तावित कर आकारणी आपणास मंजूर आहे असे समजण्यात येऊन आपल्या नावे नगरपरिषदेने केलेली प्रस्तावित कर आकारणी कायम करण्यात येईल असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे त्यामुळे सध्या कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या मनात धडकी बसली आहे.
मालमत्ता कराचे सन 2023-2024 वर्षांपर्यंतचे चतुर्थ वार्षिक मूल्यांकनाचे काम सुरु आहे. या दरामध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित नाही,ज्या मालमत्तांचे बांधकाम क्षेत्रामध्ये बदल/वापरात बदल झालेल्या मालमत्तांसाठीच वाढ होणार आहे. तसेच मालमत्ता बंद होत्या किंवा मोजमाप करण्यास नकार देण्यात आलेला अशाच मालमत्तेचे मान मोजमाप बाहेरून घेण्यात आले आहे. अशा मालमत्ता धारकांनीनी काही आक्षेप असल्यास त्वरित हरकत नोंदवावी, अशा मालमत्ता संदर्भात पुन्हा प्रत्यक्ष स्थळ पहाणी करुन व समक्ष मोजमापे घेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येइल.असे मुख्याधिकार्यांनी स्पष्ट केले.
याबाबतीत आपले घराचे कर आकारणी मध्ये तसेच केलेल्या फेरफारबाबत किंवा नावात काही चूक असल्यास किंवा मालमता संबंधित आपली कोणतीही हरकत असल्यास सदर कारणे नमूद करून ती लेखी स्वरुपात मुख्याधिकारी, नगरपरिषद यांच्याकडे 25 डिसेंबर 2022 पर्यंत किंवा तत्पूर्वी पाठवावी व त्याची पोचपावती घ्यावी.असे आवाहनही करण्यात आले आहे.
या वर्षाकरिता केलेली कर आकारणी पाहण्यासाठी कार्यालयीन वेळेत स्वतःच्या मालकीचे घर व जागेवरील कर आकारणी नपा कर विभागात पहावयास मिळेल. ज्या मालमत्ता धारकांना 119 ची नोटीस मिळाली नसेल अशा मालमत्ता धारकांनी नगरपरिषद कार्यालयात येवून ती घ्यावी.
वैभव गारवे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद कार्यालय