पुरुष गटात पांडवादेवी रायवाडी, महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स अंतिम विजेते
| अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली बुधवार, (दि.14) पी.एन.पी. महाविद्यालय वेश्वी, अलिबाग येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून आयोजित कबड्डी चषक स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली. सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी(सा.प्र.)सर्जेराव म्हस्के पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी, तहसिलदार विशाल दौंडकर, राज्य संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील, डॉ.सतिश कदम, केदार शिंदे, जगन्नाथ वरसोलकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पीएनपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
महिला गट-प्रथम -कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल, द्वितीय – भिल्लेश्वर क्रीडा मंडळ, किहीम, तालुका अलिबाग, तृतीय-टाकदेवी क्रीडा मंडळ, मांडवा, तृतीय-दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल पुरुष गट-प्रथम पांडवादेवी रायवाडी, तालुका अलिबाग, द्वितीय-ज्ञानेश्वर कोळवे, तालुका पेण, तृतीय-बजरंग , रोहा, तृतीय-मरीदेवी, धेरंड.
स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त संघांना (दोन्ही गट पुरुष आणि महिला )आकर्षक चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक (प्रथम-31 हजार, द्वितीय-21 हजार, आणि तृतीय (2 संघांना) -11 हजार) देण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता जनार्दन पाटील, जे.जे.पाटील, पी.एन.पी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.म्हात्रे, सचिन निकम, सिद्धार्थ खंडागळे, प्रफुल, सुरेंद्र, अमित, पी.एन.पी महाविद्यालयाचे खेळाडू स्वयंसेवक, डॉ.आशिष मिश्रा, डॉ.अजित बरगे व त्यांचे सहकारी आदी सर्वांचे सहकार्य लाभले.