आता निवेदन नाही, आता आंदोलन

अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी शेकापचा एल्गार

। अलिबार । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अलिबाग रामराज रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत भयावह असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. सकाळी 9 वाजता खानाव येथे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शेकापतर्फे करण्यात आले आहे. या आंदोलनाला शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील व शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित
राहणार आहेत.
शेकाप वर्धापनदिनी सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात इशारा देत टक्केवारीत अडकलेल्या अलिबाग-रामराज-रस्त्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अलिबाग रोहा रस्ता आ. जयंत पाटील, तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून 225 कोटी करुन निविदा काढल्या. या रस्त्याची वर्क ऑडर काढली. मात्र सत्तापालट झाल्यानंतर टक्केवारीवरुन रस्ता तसाच राहिला आहे.
आ. जयंत पाटील यांनी वर्क ऑर्डर आणत नितीन गडकरीं यांचेकडे पाठपुरावा करीत निधी देखील मंजुर करुन घेतला. मात्र टक्केवारीत अडकलेल्या या रस्त्याचे काम आपण पावसाळ्यानंतर सुरु करण्याचा निर्धार जयंत पाटील यांनी केला होता. त्यानुसार शेकापक्षाने निर्णय घेत बंद पडलेले काम पावसाळा संपल्यानंतर चालू करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे सदर काम चालू करायला भाग पाडण्यासाठी शेकापने आता ‘निवेदन नाही तर आंदोलन’ असा पवित्रा घेतला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थमुळे सामन्य नागरिक जे कामानिमित्त नोकरी धंद्याच्या निमित्ताने रोज अप-डाऊन करतात त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

Exit mobile version