| पेझारी | वार्ताहर |
जिल्हा क्रीडा कार्यालयाद्वारा आयोजित शालेय तालुकास्तर कबड्डी स्पर्धा अलिबाग-वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पोयनाड येथील को.ए.सो. ना.ना. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने अंतिम विजेतेपद पटकाविले. तसेच 19 वर्षे वयोगट तृतीय, तर मुलींच्या संघाला 19 वर्षे वयोगटात उपविजेतेपद मिळाले.
अंतिम विजयी 17 वर्षे वयोगटातील मुलांचा संघात कुणाल जुईकर, अंश गिरी, स्मित पाटील, रश्मीत जाधव, सुजित नाईक, वेदांत पाटील, अंश पाटील, सोहम म्हात्रे, आर्यन पाटील, ओम पाटील, आयुष ठाकूर, हर्ष पाटील या खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेत खेळ निर्णायक होता. संबंधित संघाला मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख पुरुषोत्तम पिंगळे यांनी केले. सर्व विजयी, उपविजयी संघाचे विद्यालयाचे सभापती माजी आमदार पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह ॲड. आस्वाद पाटील, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील, सवाई पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सत्र प्रमुख तृप्ती पिळवणकर, उदय पाटील, समीर भोईर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
17 वर्षे वयोगटातील मुलांचा कबड्डी संघ हा जिल्हास्तरावर अलिबाग तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.