भूमिगत विद्युत वाहिनीचे काम नियोजन शुन्य

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची नाराजी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात चालू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासंदर्भात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत प्रशांत नाईक यांनी नियोजनशून्य पद्धतीने चालू असून रस्त्याचे नूकसान अधिक प्रमाणात होत असून खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे काम संत गतीने होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

आज अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांच्या दालनात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने अलिबाग शहरात चालू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासंदर्भात महावितरण अधिकारी व या कामचे कंत्राटदारांसमवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सदर भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम अतिशय नियोजनशून्य पद्धतीने चालू असून त्यामुळे रस्त्याचे नूकसान अधिक प्रमाणात होत आहे. तसेच खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे काम संथ गतीने सूरू आहे. या सर्व सावळा गोंधळात सुरु असलेल्या कामाबद्दल प्रशांत नाईक यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पावसाळा तोंडावर आहे, जर हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांना नाहक त्रासांना समोरे जावे लागेल असे स्पष्ट केले. त्यावर महावितरण अधिकार्‍यांनी हे काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कंत्राटदारास तसेच रस्ते दुरूस्ती काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी सूचना कराव्यात व तसे न झाल्यास पुढील काम करण्यास मनाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांच्या वतीने महावितरण अधिकार्‍यांना सांगण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा, अजय झुंजारराव, महावितरणचे अभियंता मुंढे, सुर्यवंशी, तसेच इंजिनियर डफर, पाणी पुरवठा अभियंता, लीना पॉवर टॅक इंजिनियरींग कंपनीचे व्यवस्थापक ओमकार सावंत, सुनील साह, अभियंता उज्वल आदी उपस्थित होते.

Exit mobile version