| मुंबई | वृत्तसंस्था |
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टचा मिळून 66 टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. दरम्यान, शुक्रवारी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत.