नोटाने घेतली हजारो मते

। रायगड । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. भरघोस मतदान झाले असले तरी मात्र महाड विधानसभा मतदारसंघाचा अपवादवगळता जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात मतदारांनी हजारांच्या संख्येत नोटाला या पर्यायाला मते दिल्याचे उघड झाले आहे.

अलिबाग मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकाची म्हणजेच 1,658 मते मिळाली आहेत. पेण मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकाची म्हणजेच 2,473 मते मिळाली आहेत. महाड मतदारसंघात नोटाला 889 मते मिळाली आहेत.श्रीवर्धन मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकावर 3,375 मते मिळाली आहेत. कर्जत मतदारसंघात नोटाला पाचव्या क्रमांकावर 1,956 मते मिळाली आहेत.पनवेल विधानसभा मतदारसंघात नोटाला पाचव्या क्रमांकावर 3,905 मते मिळाली आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकावर 2,653 मते मिळाली आहेत. जिल्ह्यातील एकूणच मताधिक्य पाहता, प्रमुख उमेदवारांनंतर अपक्षांपेक्षा नोटाने सर्वात जास्त मते घेतल्याचे दिसून येत आहे. अलिबाग, पेण, श्रीवर्धन, उरणमध्ये चौथ्या क्रमांकावर नोटाची मते असून, कर्जत आणि पनवेलमध्ये पाचव्या क्रमांकावर नोटाला मते मिळाली आहेत. तर, महाडमध्ये नोटाची मते सहाव्या क्रमांकावर आहेत.

नोटा म्हणजे काय?
भारतात प्रामुख्याने 2013 पासून नोटा हा पर्याय मतदान प्रक्रियेत वापरण्यास सुरुवात झाली. मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएमवर सर्व उमेदवारांच्या खाली नोटा हे बटण दिलेले असते. मतदान यंत्रावरील उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्यास नोटाचा पर्याय दाबून नापसंती दर्शवण्याचा अधिकार मतदारांना आहे.
Exit mobile version