पाणीकपातीची सूचना फक्त ग्रामपंचायत कार्यालयापुरती

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जानेवारीपासून पाणीकपातीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला एक दिवसआड, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दोन दिवसआड आता गेल्या दहा दिवसांपासून तीन दिवसआड असा पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतीला याबाबत सूचना पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पाणीकपातीच्या सूचनांचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयापुरतेच असल्याच्या तक्रारी अनेक गावांतील नागरिकांकडून केल्या जात आहेत. तीन दिवसआड पाणीपुरवठा होणार असल्याची अगोदर माहिती काही ग्रामपंचायतींकडून मिळत नसल्याने गावांतील नागरिकांना पाण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागत असल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी ग्रामस्थ विचारणा करतात, त्यावेळीच ही माहिती मिळते, असा आरोप अनेक नागरिकांकडून केला जात आहे.

Exit mobile version