जिल्हाभरात मनसेच्या 165 कार्यकर्त्यांना नोटिसा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मशिदीतून भोंग्याद्वारे दिल्या जाणार्‍या बांगेला विरोध करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने त्याचे पडसाद रायगडात बुधवारी सर्वत्र उमटले. अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाने भोंग्याद्वारे बांग न देता मशिदीतच तोंडी अजानचे पठण केले.या पार्श्‍वभूमीवर रायगड पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील 165 मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या तर महाड,उरणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मनसेच्या भोंगा विरोधी आंदोलनाची पोलिसांनी गंभीर दखल घेतल्याचे जिल्ह्यात दिसून आले. मंगळवारी ईद साजरी झाल्यानंतर बुधवारी पहाटेपासून पोलिसांनी जिल्हयातील सर्वच मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. शिवाय रात्रीपासूनच संभाव्य आंदोलनाची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांवर नजरही ठेवण्यात आली होती. पनवेल, खोपोलीत भोंग्याविनाच पहाटेची अजान म्हणण्यात आल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.त् याबद्दल पक्षाच्यावतीने मुस्लिम समाजाचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे.अजूनही मशिदीसमोर बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version