एसआयआरवरून ज्ञानेश कुमारांना नोटीस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात दाखल याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी लोकशाही धोक्यात आल्याचा दावा करत ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश देण्याची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. दरम्यान, न्यायालयाने ज्ञानेश कुमार, इतर निवडणूक आयुक्त, केंद्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर मागितले. याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Exit mobile version