पॉपीरिन याला पराभूत करताना दमछाक
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अव्वल मानांकित नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस या ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत विजयासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सेई पॉपीरिन याने जोकोविचला कडवी झुंज दिली; मात्र जोकोविचने ही लढत 6-3, 4-6, 7-6, 6-3 जिंकत पुढल्या फेरीत प्रवेश केला.
नोवाक जोकोविच याने पहिला सेट 6-3 असा जिंकत आघाडी घेतली. मात्र पुढील सेटमध्ये पॉपीरिन याने 6-4 असे यश मिळवले आणि 1-1 अशी बरोबरी साधली. जोकोविचने पुढील दोन सेटमध्ये 7-6 व 6-3 अशी बाजी मारली. मात्र जोकोविचला विजयासाठी तीन तास व 11 मिनिटांची प्रतीक्षा करावी लागली.