आता फ्लोरोनाचे संकट इस्राईलमध्ये पहिला रुग्ण

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इस्राईलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा यांच्या दुहेरी संक्रमणाला फ्लोरोना म्हटले जाते. प्रसुतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला फ्लोरोनाची लागण झाली आहे. इस्राईलने प्रतिबंधक लसीचा चौथा डोस देण्याची मोहीम सुरु केली आहे. ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे; अशा लोकांना चौथा डोस दिला जात आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव सुरु झाल्यानंतर नागरिकांना लसीचा चौथा डोस देणारा इस्राईल पहिला देश आहे.

Exit mobile version