आता शासकिय कर्मचार्‍यांची मालमत्ता होणार जाहिर?

। पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सर्वच शासकीय,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचार्‍यांनी आपली वैध मालमत्ता जाहीर करावी,अशी मागणी क्रांतिवीर छावा सेना रायगड यांच्याकडुन करण्यात आली आहे़. संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रोशन पवार यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले असुन याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत विनंती करण्यात आली. यावेळी स्वप्नील घरत, अशोक घरत, जितेंद्र ठाकूर, सुरेश जाधव, अभिजित मोकल, महेश घरत, विकी वेगास उपस्थिती होते.

Exit mobile version