। वावोशी । वार्ताहर ।
डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी गट तट नव्हे तर पर्याय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आरपीआय पक्ष पुढे आणला असून त्याच अनुषंगाने यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असलेले डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन अशोक गोतार्णे यांनी केले आहे.
डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व व कार्य शैलीवर विश्वास ठेऊन 11 ऑगस्ट रोजी पनवेल या ठिकाणी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात काम करीत असलेले अशोक गोतार्णे, सुनील सोनावणे, जगदीश कांबळे, पंकज सोनावळे, सनील गायकवाड, सागर केदारी, अमर गायकवाड, दिलीप गायकवाड आदी खालापूर आणि कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अशोक गोतार्णे यांची निवड करण्यात आली असून रायगड जिल्हा सचिवपदी राकेश गायकवाड तर खालापूर तालुका अध्यक्षपदी सुनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
रायगड व खालापूर तालुक्याची कार्यकारिणीची निवड होताच रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतार्णे, खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे यांनी खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रायगड जिल्हा सचिव राकेश गायकवाड, खालापूर तालुका उपाध्यक्ष दीपक गायकवाड, छत्तिशी विभागीय अध्यक्ष जगदीश कांबळे, सागर केदारी, रोशन सोनावणे, अजय सोनावणे, शंकर सोनावणे तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा पवार, प्रवक्ते राहुल गायकवाड, हैबती जाधव, व्ही. जी. जाधव, भिकाजी गायकवाड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.