परीक्षा परिषदेने काढली नवीन अधिसूचना; अंतिम परीक्षेस प्रविष्ट उमेदवार टेट परीक्षेला पात्र
। रायगड । प्रतिनिधी ।
तुम्ही शिक्षक होण्याची तयारी करत असाल आणि त्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 (टेट) या परीक्षेची तयारी करत असाल, तर इकडे लक्ष द्या. आता शिक्षक निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करणार्यांसह संबंधित अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस असणारे उमेदवारही टेट 2025 ही परीक्षा देऊ शकणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासंदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा केली आहे. यासंदर्भातील अध्यादेश नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षेस प्रविष्ट होण्यासंदर्भातील तरतुदीमध्ये बदल केला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षा परिषदेने याबाबतची अधिसूचना ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर 25 एप्रिलला प्रसिद्ध केली आहे. परंतु, आता शालेय शिक्षण विभागाच्या अध्यादेशानुसार सुधारित तरतुदींसह परीक्षा परिषदेने नवीन अधिसूचना काढली आहे. तर दावा ग्राह्य धरणार नाही. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार टेट परीक्षेला पात्र राहणार आहेत.
हे उमेदवार टेटसाठी पात्र
1) शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे
2) शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे
3) शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे.