। खांब । वार्ताहर ।
रोहा-माणगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाले गावचे सुपुत्र सुभाष शेवंती तुकाराम माळी यांचा भारत उद्योग गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
बॉडीशेप फिटनेस इक्विपमेंटचे उद्योजक क्षेत्रात कार्यरत असणार्या उद्योजकांना ठाणे येथे संपन्न झालेल्या शानदार कार्यक्रमात सदरील प्राईम टायकॉन मेडिया भारत उद्योग गौरव पुरस्कार देऊन त्यांना सिने अभिनेत्री अमिषा पटेल आणि निलेश साबळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान बॉडीशेप फिटनेस इक्विपमेंट उद्योजक क्षेत्रात कार्यरत असणारे सुभाष माळी यांनी या क्षेत्रात गेली अनेक वर्षे सतत कार्यरत राहून मुंबई ठाणे व रायगड जिल्ह्यातील विविध भागात सर्वोत्तम दर्जाची जिमची उभारणी केली आहे. इतकेच नव्हे तर तरूण-तरुणी आणि युवक-युवती यांना फिटनेस बाबतीत कार्यशाळेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बॉडीशेप फिटनेस इक्विपमेंट उद्योजक सुभाष माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होताना दिसत आहे.