भारत बायोटेकच्या लसीला डीसीजीआयकडून मंजुरी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत बायोटेकने विकसित केलेल्या इइत-154 इंट्रानॅसल लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी माहिती दिली. नाकावाटे दिली जाणारी ही भारताची पहिली लस आहे. ही लस 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला मोठे बळ मिळाले असल्याचे ट्वीट त्यांनी केले. भारत बायोटेकच्या उहअव36-डअठड-उेत-ड उजतखऊ-19 नेझल वॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देत असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.
लसीची चाचणी पूर्ण
मागील महिन्यात या लशीची तिसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करण्यात आली होती. इइत-154 इंट्रानसाल लसीची पहिली आणि तिसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणीदरम्यान, ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात आली होती. पहिल्या डोसच्या चाचणीसाठी अनेक पातळीवर चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करण्यात आली होती. संपूर्ण भारतात 14 ठिकाणी लस चाचणी केली होती.
नेझल व्हॅक्सिनला देण्यात आलेली मंजुरी ही कोरोना महासाथीच्या विरोधातील आपल्या सामूहिक लढाईला आणखी मजबूत करेल, असा विश्वास आहे.
– डॉ. मनसुख मंडविया, केंद्रीय आरोग्यमंत्री