पाटणा | वृत्तसंस्था |
बिहारमध्ये विषारी दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा आकडा 24वर पोहचला आहे. बेतियातील तेलहुआ गावात बुधवारी आठ जणांचा विषारी दारुने मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर होती. या दुर्घटनेवरुन विरोधी पक्षांनी सत्ताधारी जनता दल संयुक्त आणि भाजपवर निशाणा साधला होता. तसेच सरकारमधील मंत्री जनक चमार यांनीही विषारी दारु हे कारण सांगितले जात असले तरी 24 जणांच्या मृत्यू होण्यामागे मोठे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.