विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आलिबाग, रायगड जिल्हा परिषद अलिबाग, तसेच महिला व बालकल्याण विभाग अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण अभियान कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन प्रकल्प अधिकारी गीतांजली गजानन पाटील, गीताई कटोर, उल्का कुलकर्णी, विनोदिनी मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली बामणगाव- काविर येथील सदानंद कवळे यांच्या गार्डन हॉल येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला शेळके, तेंडुलकर हायस्कूल रेवदंडा माजी प्राचार्य गजानन पाटील, काविर ग्रामपंचायत सरपंच राजू म्हात्रे, उपसरपंच प्रेरणा प्रवीण कदम, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, सांख्यिकी विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे, पर्यवेक्षिका उल्का कुलकर्णी, विनोदिनी मोकल, गीताई कठोर, कल्पिता साळगावकर, भाग्यश्री पाटील, दीप्ती मोकल, सामीया पेरेकर, अपेक्षा म्हात्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, आहार प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या, विभागातील उत्कृष्ट कार्य आणि सेवा देणार्या अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी सेविका व आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार 2022 देऊन त्यांचा सन्मानपत्र, साडी व भेटवस्तू अशा स्वरूपात बक्षीस देवून त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण कमिटी सदस्य तसेच झेप फाउंडेशन संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण कमिटी सदस्य प्रियदर्शनी पाटील, प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, सरपंच राजू म्हात्रे, उपसरपंच प्रेरणा कदम, माजी जि.प.सदस्या प्रमिला शेळके यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम क्रमांक राजश्री शेळके सहानगोठी अंगणवाडी, द्वितीय क्रमांक सुरेखा वाळंज पाल्हे अंगणवाडी, तृतीय क्रमांक दीक्षा कर्णेकर नागाव बंदर अंगणवाडी तसेच आहार प्रदर्शनामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक प्रगती पद्माकर मानाकर कुंठ्याची गोठी मदतनीस, द्वितीय क्रमांक नेहा नंदकुमार भगत खारिकपाडा मदतनीस, तृतीय क्रमांक विनया विनोद भगत खुटळवाडी मदतनीस यांनी पटकाविल्याबद्दल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका वैशाली पाटील तसेच अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका गीताई कटोर यांनी केले. तसेच यावेळी सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांच्या तर्फे फोटो फ्रेम भेट स्वरूपात देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमासाठी सभागृह व साऊंड सिस्टीम सदानंद कवळे यांनी उपलब्ध करून देवून विशेष सहकार्य केले.