| वाघ्रण | वार्ताहर |
चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण वर्ग केंद्रातर्गत पोषण आहार प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षण केंद्र ए.एन.एम. प्रथम वर्ष 2024 च्या या प्रदर्शनाचे उद्घाटन पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहम डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिंचवली ग्रा.पं. सरपंच कुंदा गावंड, उपसरपंच अल्पेश पाटील, पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. भक्ती पाटील, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या सारीका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिसेविका म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. तर पाठ्य निर्देशिका स्वाती मोरे, प्रियांका साबळे, वैभवी थळे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परिचर्या मलिष्का जाधव यांनी केले. प्रदर्शनात पोषण आहारात आवश्यक विटॅमिन्स आधारीत पदार्थ अन्न पदार्थ व त्याबाबत माहिती प्रशिक्षणार्थीना दिली.