| शिहू | प्रतिनिधी |
सीडीपीओ प्रवीण पाटील, सुपरवाझर प्रतीक्षा वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिहू अंगणवाडी क्र. 2 येथे मंगळवारी (दि.23) पोषण महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यात पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपली पाककला सादर केली. पोषण महाअभियान हे कुपोषण कमी करण्यासाठी आणि सर्वांगीण पोषणाला प्रोत्साहान देण्यासाठी भारत सरकारचे एक राष्ट्रीय अभियान आहे. जे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरे केले जाते.
मुलांमधील कुपोषण, बालमृत्यू, अशक्तपणा आणि कमी वजनासारख्या समस्यांवर मात करणे, तसेच किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणी स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा करणे हे याचे मुख्य उद्दिष्ठ आहे. या अभियानात तंत्र ज्ञानाचा वापर समुदायचा सहभाग आणि आहारातील विविधतेवर भर देऊन आरोग्य व प्रतिकारशक्ती वाढवणारे उपाय केले जातात. या अभियानात येथील पालकांसह किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता यांनी सहभाग दर्शवला. यावेळी अंगणवाडी सेविका जयश्री म्हात्रे, मीना घासे, रजनी कुथे, योजना भोईर, सुरेखा कुथे, संगीता पाटील, प्रगती चोरगे, वैशाली कोळी, वासंती पाटील, सुनीता गोरे, हिरा पाटील, सुरेखा फसाळे, सुमती शिद इत्यादी उपस्थित होत्या.







