ओबीसी सेनेचा प्रीतम म्हात्रेंना पाठिंबा

। उरण । प्रतिनिधी ।

उरण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या शिट्टी चिन्हावरील बटण दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र ओबीसी सेनेचे अध्यक्ष शरद भोवर यांनी केले आहे.

1 मे 1971 रोजी स्व. गजानन राव भोवर, अ‍ॅड. जर्नादन पाटील व अ‍ॅड. नारायणराव कोळी यांच्या मदतीने अखिल मागास संघर्ष कमिटी स्थापन केली होती. गजानन राव भोवर हे कट्टर जनसंघाचे व ओ.बी.सी. चळवळीचे मुळ संस्थापक होते. त्यांनी केलेल्या त्यागामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. परंतु, गेल्या 10 वर्षात भाजपाने महाराष्ट्रतील 6.5 कोटी गरीब ओ.बी.सी. दुर्बल घटकांचे फारच नुकसान केले. खाजगीकरण करून त्यांच्या सरकारी नोकर्‍या घालवल्या. त्यामुळे मंडल आयोग छिन्ह विछिन्न करणार्‍या भाजपाला एकही मत न देता स्व. दि. बा. पाटील यांचा अपमान करणार्‍या उमेदवाराचा दारुण पराभव करा. तसेच, एकजुटीने शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांना विजयी करा, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version