| अलिबाग | विशेष प्रतिनिधी|
अलिबाग शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती तसेच डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महावीर चौक ते बालाजी नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता समुद्र किनारा ते पोस्ट ॲाफिस अलिबाग पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या कामाची नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पाहणी करीत काही सूचना केल्या. नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.