उनपाच्या नाल्यावर फेरीवाल्यांचा कब्जा

प्रशासनाचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |

उरण नगरपालिका हद्दीत परप्रांतियांची मक्तेदारी वाढली आहे. नगरपालिका नाल्यावरच फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटून कब्जा केला आहे. याकडे प्रशासन सरळ-सरळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे नगरपालिका जागेवर कब्जा केला आहे.

उरण नगरपालिका हद्दीत परप्रांतीय फेरीवाल्यांनी नगरपालिकेच्या जागेवर आपल्या मालकीची समजून आपला छोटी-मोठी व्यवसाय थाटला आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. काही नगरपालिका कर्मचाऱ्यांनीही नगरपालिकेच्या मोक्याच्या जागेवर कब्जा करून त्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे या फेरीवाल्यावर कारवाई कोणी करायची, असा सवाल उपस्थित होत आहे.

यामुळे शहरात नाक्या-नाक्यांवर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तसेच नागरिकांना पायी चालणेही कठीण बनले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे.

Exit mobile version