हिंदू-लिंगायत समाजाची; ओबीसीचे दाखल्यांची मागणी

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
हिंदू-लिंगायत समाजाला ओबीसीचे दाखले द्यावे अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेने मुंबई येथे झालेल्या बैठकीत विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सुचना केल्या आहेत.लिंगायत समाजातील ओबीसी प्रवर्गातील समाजाला ओबीसी दाखले मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने हिंदू-लिंगायत असलेल्यांना ओबीसीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी जागतीक लिंगायत सभेचे नेते प्रदिप बापूवाले, राजशेखर तंबाके, शिवानंद कथले, प्रविण बिराजदार यांनी वडेट्टीवार यांच्या समवेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत केले आहे. वडेट्टीवार यांनी लिंगायत समाजाच्या मागणीचा सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सुचना केल्या आहेत.

Exit mobile version