| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोरिशन लिमिटेडच्यावतीने ‘ऑफ साईड मॉक ड्रील’ कार्यक्रम आयोजन शुक्रवारी (दि.1) हाळ बुद्रुक येथील 65.3 एचपीसीएल के.एम.पॉईंट येथे केले होते. एच.पी.सी.एल.कंपनीची 508 किलोमीटर लांबीची मुंबई-पुणे-सोलापूर पाईप लाईन ही कार्यरत आहे, ही पाईप लाईन ग्रामीण भागातील गावांमधून जात असून ही अत्यंत ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करत असल्याने या ज्वलनशील पदार्थाची सर्व नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने माहीती मिळावी म्हणून एच.पी.सी.एल.कंपनी दरवर्षी करते. तसेच, याही वर्षी ‘ऑफ साईड मोक ड्रील’ अर्थात आपात कालीन प्रतिसाद आपत्ती व्यवस्थापन योजनेसारखा कार्यक्रम राबविला होता, तर यामध्ये एमपीएसपीएल खोपोली, यूसीएसपीएल उरण व एमपीएसपीएल वाशी कंपनीच्या समावेश होता.
खोपोली हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोरिशन लिमिटेडच्यावतीने हाळ बुद्रुक येथे ‘ऑफ साईड मोक ड्रील’ कार्यक्रम एचपीसीएलचे चीप मॅनेजर गिरीश राऊत, मॅनेजर विवेक कुमार दिनकर यांच्या आयोजनातून पार पडला. यावेळी वाय.पी.पतंगे, आशिष मोरे, गजानन काटेकर, राजेंद्र ठोकेकर, अरविंद चव्हाण, रोहित सी, हसन जळगावकर, गिरीश राऊत, विवेककुमार दिनकर तसेच, मोठ्या संख्येने एचपीसील कंपनीची व्यवस्थापक मंडळ कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.