दादागिरीला लगाम

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवले
नारायण राणे यांना अटक
महाड न्यायालयात हजर
राज्यभरात निदर्शने, घोषणाबाजी, दगडफेक
रत्नागिरी | महाड | प्रतिनिधी |
जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात महाड येथे अवमानकारक वक्तव्य करणार्‍या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी मंगळवारी संगमेश्‍वरनजीक गोळीवली येथे अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी राणे यांच्यावतीने रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता.पण न्यायालयाने तो अटकपूर्व अर्ज फेटाळल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली.दरम्यान,राणे यांचा ताबा महाड पोलिसांनी घेतला असून, त्यांना बुधवारी सकाळी 10 वाजता महाड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नारायण राणेंच्या विरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली त्यांच्या अटकेबाबतची माहिती राज्यसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे.

उद्या महाड कोर्टात
दरम्यान,रात्री उशिरा राणे यांचे महाड येथे पोलीस बंदोबस्तात आगमन झाले.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.बुधवारी सकाळी 10 वाजता राणे यांना महाड तालुका न्यायालयात हजर केले जाणार आहे.या पार्श्‍वभूमीवर महाड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version