मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट

| मुंबई | प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी मुंबईतील समता नगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप भालेकर असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

भालेकर यांनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिंदे व फडणवीस यांनी आपल्याला ठार मारण्याचा कट रचला आहे. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येबाबतही खळबळजनक वक्तव्य ट्वीटमध्ये करण्यात आले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, भालेकर यांनी देखील ट्विटरवरून आपल्यावर गुन्हा का दाखल झाला याबाबत माहिती दिली असून. याबरोबरच पोलिस आपल्या आईला आणि बहिणीला त्रास देत असल्याचा आरोप भालेकर यांनी त्यांच्या ट्विटरून केला आहे.

Exit mobile version