विरार-आलिबाग कॉरिडॉर संबंधी अधिकार्‍यांनी साधला शेतकर्‍यांबरोबर संवाद

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (दि.3) विरार अलिबाग कॉरिडोर रस्त्यासंदर्भात बाधित शेतकरी व महसूल विभागाचे शासकीय अधीकारी यांची बैठक संपन्न झाली. प्रांत अधिकारी राहुल मूंडके यांनी या बैठकीमध्ये शेतकर्‍यांसोबत संवाद साधत विरार अलिबाग कॉरिडॉरबाबत माहीती देतानाच शेतकर्‍यांना कशाप्रकारे मोबदला मिळेल याबाबत ही माहीती दिली. सरकारचा महत्त्वाचा विरार-अलिबाग कॉरिडोर हा महामार्ग उरण तालुक्यातील गावांमधून जात आहे.त्यामुळे बांधित शेतकरी व सरकार यांच्यात कोणत्याही विषयावर गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी पनवेल येथील उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या उपस्थितीत उरण पंचायत समितीच्या सभागृहात बैठक एकूण तिन टप्प्यात पार पडली. त्यामध्ये प्रथम टप्प्यात बैलोंडाखार मधील शेतकरी, दुसर्‍या टप्प्यात धाकटी जुई, टाकीगाव, चिरनेर, भोम या गावातील शेतकरी तर तिसर्‍या टप्प्यात कळंबुसरे, पिरकोन, कोप्रोली इत्यादी गावांतील शेतकरी अशी बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी अधिकारी राहुल मुंडके यांनी माहीती बरोबरच शेतकर्‍याच्या प्रश्‍नांना देखील उत्तरे दिली.


यावेळी पंचायत समिती उपसभापती शुभांगी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका काँग्रेस अध्यक्ष जे.डी. जोशी, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, शेकाप चिटणीस सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, माजी सरपंच विलास पाटील, पी.डी.जोशी, कुलदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सुधाकर पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह पाचशेच्यावर शेतकरी उपस्थीत होते.

Exit mobile version