। अलिबाग । प्रतिनिधी ।
साळावपासून ताडगावपर्यंतच्या विहिरींमध्ये एका व्यक्तीने विष टाकल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्याला पकडण्यास ग्रामस्थांना यश आले. नागरिकांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. विहिरीत विष टाकणार्या इसमाच्या मुलीचे एका मुलावर प्रेम आहे. तिला प्रेमापासून दूर ठेवण्यासाठी एका बुवाने 25 विहिरीत जडीबुटी आणि वीट टाकण्याचा सल्ला दिला. बुवाच्या सांगण्यानुसार, त्याने हा प्रकार रविवारी सकाळी केला. साळावपासून ताडगावपर्यंतच्या पाच विहिरींमध्ये त्याने जडीबुटी आणि वीट टाकली. ताडगावच्या विहिरीत हा प्रकार करीत असल्याचे तेथील स्थानिकांच्या लक्षात आले. स्थानिकांनी त्याला रोखले. त्यानंतर त्याला विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले. त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला, त्यामुळे त्याने काहीतरी विष टाकल्याचा संशय निर्माण झाल्याची चर्चा आहे.