| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील वाकण येथील अंबा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.11) रोजी दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अभिषेककुमार अवधेश राय (22) रा. नागोठणे- रोहा, असे तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल समूहाच्या एका कंपनीत कंत्राटी कामगार असलेला हा तरुण आज रविवारची सुट्टी असल्याने वाकण येथील अंबा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. या तरुणाला नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पोहताही येत नसल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलिस करीत आहेत.