अरे बापरे! कोरोनामुळे पुन्हा येणार निर्बंध….जाणून घ्या!

। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू केले जाणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचे भाष्य केले आहे. राज्यामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला जाईल का असे विचारले असता अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यांमध्ये काय चाललंय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललंय हे आम्हाला सांगतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पहायला मिळालं की करोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.


पुढे बोलताना पवार म्हणाले कि, डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणार्‍यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणं बंधनकारक केलं पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version