| उरण | वार्ताहर |
गेले चार दिवस संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सकल भागात पावसाचे पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.त् यात म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, नाल्यात वाहने पडल्याची घटना घडली आहे. उरण शहरातील नाले तुडुंब भरून शहरातील रस्त्यांवर नदीचे स्वरून निर्माण झाले आहे. चिरनेर गव्हाण फाटा रस्त्यावरील दिघोडे पेट्रोल पपं बाजूला तसेच कंठवली गावाजवळ रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. शाळा, कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता काढणे मुश्किल झाले आहे. तसेच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे, नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.