जिल्हा पत्रकार संघातर्फे ना. ना. पाटील यांची जयंती साजरी

अलिबाग | प्रतिनिधी |

बहुजन समाजाचे नेते , माजी आमदार, झुंझार पत्रकार व ” क्रुषीवल ” चे संस्थापक स्व. नारायण नागू  पाटील यांची १२९ वी जयंती  रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राम – नारायण पत्रकार भवनात साजरी झाली स्र्वर्गीय ना. ना. पाटील यांच्या प्रतिमेस  सखाराम पवार यांनी तर स्वर्गीय रामभाऊ मंडलीक यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी पुष्पमाला चढविली. त्यानंतर पत्रकार संघाचे सल्लागार सखाराम पवार व कुलाबा वैभव संपादक बळवंत वालेकर यांनी स्वर्गीय ना. ना. पाटील यांच्या आठवणी विशद केल्या. प्रारंभी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी  यांनी  प्रास्तविक केले.  
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी  कुलाबा वैभव संपादक बळवंत  वालेकर , सल्लागार सखाराम  पवार , नाट्यकर्मी शरद कोरडे , लेखक हेमकांत सोनार इ. उपस्थित होते.

Exit mobile version