जन्माष्टमीच्या दिवशी 25 दारुबंदीचे गुन्हे

73,430 रुपये किंमतीची विदेशी व गावठी हातभट्टीची दारु जप्त

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील नागोठणे, कोलाड, म्हसळा, कर्जत, मांडवा, तळा, वडखळ, रेवदंडा, पोलादपूर, पेण, गोरेगाव, दादर सागरी पोलिस ठाणे, श्रीवर्धन, नेरळ, खालापूर, पोयनाड,रोहा, महाड या सर्व पोलिस ठाण्यांतर्गत एकूण 25 दारुबंदीचे गुन्हे सोमवारी (दि.30) दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकूण 73,430 रुपये किंमतीची विदेशी व गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 25 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version