रजा मंजूर नसतानाही रजेवर
पेण | वार्ताहार |
पेण तालुक्यातील पाबळ केद्रांमध्ये रा.जि.प.शाळा गौळावाडी येथे या शाळेच्या शिक्षकांनी नॅशनल टीव्हीवर चुकीची माहिती देऊन आपल्यावर अन्याय होतोय, अस चित्र उभ केलं होत. परंतु उभ केलेलं चित्र थोतांड व खोट असल्याचे समोर आल्यानंतर या शाळेवरील प्रिया जयवंत आसोलकर या शिक्षिका तेव्हापासून पुन्हा शाळेकडे फिरकल्याच नाहीत. त्यानंतर प्रसार माध्यमांनी वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु पेण पंचायत समिती शिक्षण विभागाकडून ती माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
प्रिया आसोलकर या बालसंगोपणेच्या रजेवर आहेत, असे ही सांगण्यात आल. परंतु बाळ संगोपणाची रजा ही जिल्हा परिषदेकडून दिली जाते. जिल्हा परिषदेला प्रिया आसोलकर यांनी अर्ज केला असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी 26 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे शिक्षण परिषद गाठून प्रिया आसोलकर यांचा रजेचा अर्ज आला आहे का, याबाबत माहिती घेतली असता कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज जिल्हा परिषदे कडे आला नसल्याचे समजले. महत्वाची बाब म्हणजे बालसंगोपणाची रजा हवी असल्यास कमीत कमी आठ दिवस आणि जास्तीत जास्त 16 दिवस अगोदरचा रजेचा अर्ज असणे गरजेच आहे. परंतू प्रिया आसोलकर या 7 जुलैला रजेवर जातात आणि जिल्हा परिषदेला 3 ऑगस्टला अर्ज जातो. ही बाब मोठी आश्चर्यजनक असून हया प्रकणात गटशिक्षण अधिकारी अरूणादेवी मोरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी गौळावाडी ग्रामस्थ करत आहेत.