। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि ग्रंथालयाच्यावतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला शाखा विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, कार्यालय विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील, ग्रंथपाल कांचन म्हात्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मिलिंद घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथपाल कांचन म्हात्रे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये आजच्या दिवसाचे महत्व सांगत असताना महाविद्यालयातील वाचन दिनाचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक मिलिंद घाडगे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर ऐतिहासिक दृष्टिकोनातून भाष्य केले.
कला विभाग प्रमुख प्राध्यापक नम्रता पाटील यांनीही आजच्या वाचन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचन हे किती महत्त्वाचे आहे याचे महत्व पटवून दिले. आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकर पोटे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे विवेचन करत असताना आपल्या पद्य साहित्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी दिनानिमित्त महाविद्यालयाची वाचन परंपरा ग्रंथालयामध्ये कायम सुरू ठेवली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.