नारायणगाव रस्त्याच्या कडेला वणवा

। सुतारवाडी । वार्ताहर ।
नारायणगाव रस्त्यांच्या दुतर्फा दि. 28 डिसेंबर रोजी वणवा लागला. रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे आहेत. त्यात आंब्याची कलमे ही मोठ्या प्रमाणावर आहेत. अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला वाढलेल्या गवतावर आग लावली असावी असा वर्तविण्यात येत आहे. हा वणवा वार्‍यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रमाणावर पसरला गेला. या परिसरात थोड्या प्रमाणावर फार्म हाऊस आहेत. या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याची व अन्य झाडे आहेत. या झाडांपर्यंत मोठ्या प्रमाणावर झळ पोहोचली आहे. दरवर्षी या ठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु कोणीही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे येथील वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Exit mobile version