मन सून्न! भीमाशंकरला जाताना वाटेतच घडला भयानक प्रकार

शिडी घाटातून पडून ट्रेकर्सच मृत्यू; पहिल्याच सोमवारी घडली घटना
| नेरळ | प्रतिनिधी |
भीमाशंकरला जाणाऱ्या ट्रेकरचा शिडीघाटात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्या ट्रेकर्सल स्थानिक लोकांच्या मदतीने नेरळ पोलीस ठाणे यांच्या पोलीस पथकाने तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनी झोळीतून मृतदेह खाली पायथ्याशी असलेल्या गावात आणला.

श्रावण महिना सुरू झाला असून भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्त आणि ट्रेकर्स हे कर्जत तालुक्यातील खांडस येथून जात असतात.कर्जत तालुक्यातील खांडस गणपती घाट आणि शिडी घाट अशा दोन रस्त्यांनी भक्त प्रवास करीत असतात. मुंबई बोरिवली येथून 50 जणांचा ग्रुप भीमाशंकर येथे जाण्यासाठी सकाळी 10 वाजता निघाला होता. या ग्रुपचे गजानन दळवी यांच्यासोबत सगळे निघाले होते. दुपारी अडीच वाजण्याचा सुमारास सगळे नेरळ येथे आले त्यानंतर खाजगी वाहनाने सर्वानी खांडस येथून भीमाशंकर अभयारण्याकडे जाणारा रस्ता गाठला.

मात्र त्यांच्यापैकी अर्ध्या समूहाने गणपतीघाट रस्ता निवडला आणि त्यांनी गणपती घाटमार्गे गेले. तर गजानन दळवी त्यांचे कुटुंबीय व इतर शिल्लक सदस्य हे शिडीघाटमार्गे निघाले. शिडीवरून पुढे जाताना एका एका व्यक्तीलाच जावे लागले असता सगळ्या सदस्यानंतर स्वतःच्या कुटुंबाला पुढे पाठवून एक महिला शिल्लक राहिली होती. गजानन दळवी यांनी तिला पुढे पाठवले व ते शेवटी शिडीमार्गे निघाले. मात्र यावेळी त्यांचा पाय घसरला व ते थेट खाली कोसळले. डोंगरामार्गे शिडीघाटातून भीमाशंकर येथे जात असलेल्या ट्रेकर्स च पाय घसरवून पडत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईक यांनी गजानन दळवी आले नसल्याने मदतीसाठी संपर्क केला.त्यानुसार शनिवार दिनांक 19 ऑगस्ट सकाळी भिमाशंकर काठेवाडी येते वनविभागाच्या चौकी वरून तुंगा ट्रेकरच्या अमर चिमटे या तरुणाला याबाबत माहिती देण्यात येऊन मदत मागितली. त्यानुसार अमरने पोलिसांना प्रथम माहिती देत स्वतः सह इतर सदस्य गणेश दिवाळे, सचिन हांडे, दिलीप डामसे, मनोज काठे, अजय हांडे, संतोष काठे, ज्ञानेशोर काठे, संजय काठे यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी कळंब दूरक्षेत्र पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे हवालदार निरंजन दवणे, होमगार्ड मनिष खुणे सह तिथे पोहचले.

ट्रेकर्सचे कुटुंब देखील सोबत होते आणि या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अंकित कळंब दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी दीड तास पायपीट करत झोळीतून मृतदेह खाली आणला असून या वर्षाच्या श्रावण महिन्यातील ही पहिलीच घटना असून या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त होत आहे.नेरळ पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर अमर चिमटे, सहकारी व पोलिसांनी झोळी करून तब्बल दीड तास पायपीट करत पदरवाडी गाठली व तिथून रुग्णवाहिकेतून दळवी यांचा मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

अनुभवी ट्रेकर्सचा मृत्यू
गजानन दळवी हे अनुभवी ट्रेकर होते. तर गेली 12 वर्षे ते सातत्याने भीमाशंकर ट्रेक शिडी घाटमार्गे करत होते. मात्र यावेळी दुर्दैवाने त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपस नेरळ पोलीस करत आहेत.

Exit mobile version