अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकाला अटक

। पनवेल । प्रतिनिधी ।

पोलिसांनी ड्रग्जविक्रीविरोधात कारवाई करत एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

उलवे परिसरात ड्रग्जविक्रीच्या घटना सातत्याने उघड होत असून, यापूर्वीही पोलिसांनी अनेक कारवाया केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अमली पदार्थांची विक्री आणि सेवनाचे प्रकार सुरूच असल्याचे समोर येत आहे. उलवे परिसरात एक व्यक्ती मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अवेज समीर पठाण (36) रा. उलवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Exit mobile version