सामुहिक बलात्कार प्रकरणी एक अटकेत

। मुंबई । प्रतिनिधी ।
वाढदिवसासाठी मित्राच्या घरी नेऊन एका 25 वर्षीय महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीसह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. मूळची बिहारची असलेली ही महिला सातबंगला परिसरात कुटुंबियांसह राहते. तिचा पती सुरक्षारक्षक आहे. शुक्रवारी तो घरी आला आणि त्याने तिला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर ते सायंकाळी अंधेरीतील सुरेशनगर परिसरात राहणार्‍या व्यक्तीकडे गेले होते. आपला मित्र एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो, असेही त्याने तिला सांगितले होते.

Exit mobile version