| नाशिक | प्रतिनिधी |
रेल्वेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. बसण्याच्या जागेवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. निफाडजवळ खेरवाडी रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत ही घटना घडली आहे. रेल्वेमध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. खेरवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून दोन ते तीन गाड्या थांबवण्यात आल्याची देखील माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे.