। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावात क्रेशरवर काम करताना पाय घसरून एका 30 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (20 जून ) घडली.याबाबतची खबर उमेश नारायण महाडिक(वय-46) रा.कांदळगाव ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अनिलकुमार अलीयार राम (वय-30) रा.कोईनी,बिहार हा मंगेश सुरेश पोळेकर यांच्या क्रेशरवर काम करीत असताना पाय घसरून खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास औषधोपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले असता तो उपचार चालू असताना मयत झाला.